पाचोरा येथे समता सैनिक दलाचे कार्यालय उद्घाटन,समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित !:राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल
Samata Sainik Dal office inaugurated in Pachora, Samata Sainik Dal Dr. Inspired by the thoughts of Babasaheb Ambedkar!: State President Dharmabhushan Bagul
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
दिनांक १८ एप्रिल रोजी राज्याध्यक्ष धर्मभुषण बागुल यांचे हस्ते करण्यात आले .भारतीय संविधान व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रखरतेने जपणूक करणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी सतत झगडणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी हा एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण आहे .पाचोरा तालुक्यात समता सैनिक दलाचे अधिकृत तालुका कार्यालय आता अखेर प्रत्यक्षात कार्यान्वित झाले. हे केवळ कार्यालय उघडण्याची बाब नाही, तर समतेच्या लढ्याला नवे अधिष्ठान, नवसंजीवनी देणारी घटना आहे. कारण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पुरोगामी, समतेचे कार्यकर्ते, चळवळीत झिजलेले कार्यदूत, पत्रकार बांधव आणि समता सैनिक दलाच्या विचारांनी प्रेरित असंख्य लोकांनी हे कार्यालय असावे ही अनेक दिवसांपासून मागणी होती. आता ती मागणी पूर्ण होऊन एक नवा अध्याय सुरू होत आहे. समता सैनिक दल – एक ऐतिहासिक चळवळ आहे. समता सैनिक दल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्याचा उद्देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे. आज ही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रांमध्ये असमानता, जातीभेद, अन्याय अशा गोष्टी दिसून येतात. अशा वेळी समता सैनिक दलाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.”असे विचार राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांनी व्यक्त केले. समता सैनिक दलाचे राज्य संघटक आयु. विजय निकम यांनी सांगितले की ,पाचोरा तालुक्यात गेल्या काही वर्षांत दलाच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम, संविधान जागर मोहिमा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, तरुण कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे.असे मत व्यक्त केले. त्याच बरोबर समता सैनिक दलाचे
आंबेडकरी मिशन बाबत सविस्तर माहिती दिली.
या उद्घाटन कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते, शिक्षक,प्रबोधनकार, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, महिलाप्रतिनिधी सहभागी झाले होते.
हे कार्यालय उद्धाटन केवळ वास्तूचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची, नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे. दलाचे विचार हे केवळ भाषणांपुरते किंवा पोस्टरपुरते न राहता, ते गावागावात, खेड्यापाड्यांत पोहोचावेत, यासाठी या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र, संवाद मंच, माहिती केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष मा.किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले. समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव अरुण खरे व पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे ,तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावर घेतले होते. सर्व घटकांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पाचोरा शहरातील सामजिक,राजकिय,
पुरोगामी व आंबेडकरी चळवळीतील नेते, तालुक्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील युवक, शेतकरी संघटना, बहुजन संघटना, आंबेडकरी व पुरोगामी संघटना युवक मंडळे आणि विविध शाळा-शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला
समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल हे गेली अनेक दशके सामाजिक चळवळीतील सक्रिय आणि स्फूर्तीदायक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि समतावादी विचारांचा प्रचार यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या हस्ते पाचोऱ्यात कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद असल्याचे मत जिल्हा सचिव अरुण खरे व तालुका अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर साळवे यांनी व्यक्त केले.जिल्हा सचिव अरुण खरे, तालुका अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर साळवे अजय संसारे, विक्की ब्राह्मणे,अशपाक शेख, शांताराम गायकवाड दिलीप पवार,चंद्रकांत
सोनवणे,प्रवीण सावळे, शांताराम सोनवणे,मेजर श्याम ब्राह्मणे,भैय्या गायकवाड, निलेश सपकाळे,ऍड.ईश्वर जाधव,अनिल ब्राह्मणे, सुनील ब्राह्मणे,दीपक भिल पदाधिकारी उपस्थित होते.