समस्त मुस्लिम समाजाची भावना दुखावणाऱ्या रामगिरी महाराज वर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी
आकोट मुस्लिम समाजाची मागणी
अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोट शहर पोलिस निरीक्षक मार्फत पोलिस महासंचालक यांना निवेदन सादर रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सित्रर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदाया समोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे. त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाची भावना दुखावल्या गेली आहे समाजा मध्ये प्रचंड प्रमाणात रोष पसरलेला आहे म्हणून पोलिस विभागाने रामगिरी महाराज यांच्या वर कडक कारवाई करावी त्यांना अटक करावी अशी मागणीएका निवेदनाद्वारे आज आकोट मुस्लिम समाजाने पोलिस महासंचालक यांच्या नावे अकोट शहर पोलिस निरीक्षक अमोल मालवे यांना केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजुन
धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचे समजते.
मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात त्यामध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणुन कसे जगाये याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे बक्तव्ये केली जात नाही.
भामट्या रामगीरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, ही नम्र विनंती तर्फे
समस्त मुस्लिम समाज अकोट
निवेदन देते वेळी मौलाना आमीर रज़ा हुसेन खोकर अनवर आसीफ गवर्नर शारीक खान सलमान खान शोएब इक्बाल आदि मान्यवर उपस्थित होते