अकोला न्यूज:आकोट ख.वि.स. निवडणूकीत सहकार पॅनलने बाजी मारली

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

आकोट:आकोट तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्रीसमितीच्या २१ संचालकपदाकरिता ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४वाजेपर्यंत निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ पासून कास्तकार सभागृहात मतमोजणी पार पडली. या संस्थेच्या निवडणुकी निकालात सहकार पँनलने बाजी मारली आहे.
या संस्थेच्या संलग्न सहकारी संस्था मतदार संघात दहा जागेवर सहकार पँनलचे रमेश श्रीराम हिंगणकर(३८), हिदायतऊल्ला खां पटेल(४२),सुभाष रामकृष्ण मगर(३८), हरीभाऊ गजानन मानकर(३६),माधव नारायणराव बकाल(३५),
संतोष मनोहरराव पुंडकर(३४),कुलदिप वामनराव भिसे(३४),सुरेंद्र नारायण ठाकरे(३३),मनोहर मोतीराम सावरकर(३३),अनोख डींगाबर राहणे(३२) हे बहुमताने विजयी झाले या मतदारसंघात ५८मतदार यांनी मतदान केले त्यापैकी चार मते कवैध ठरली होती. या मतदारसंघात शेतकरी पॕनलला एकही उमेदवार विजय होऊ शकला नाही. तर वैयक्तिक सभासद मतदार संघात सहा जागेसाठी २४०० संस्था सभासद मतदार होते. त्यापैकी १ हजार ७४५ मतदान झाले. त्यामध्ये१ हजार ६७२मते वैध तर ७३ अवैध मतदान झाले. या मतदार संघात सहकार पॕनलकडून शेषराव लक्ष्मणराव वसू (१०२३),दयाराम काशिराम धुमाळे (१११८),,दिपक विश्वनाथ पवार (१०४५),त्र्यंबकराव गुलाबराव मंगळे (१०३१),श्रीकृष्ण राजाराम रोठे(१०२१), दत्तात्रयश्रीराम तळोकार (१०८३), तर महिला राखीव मतदार संघातून दोन जागेसाठी सहकार पॕनलच्या वृषाली दत्तात्रय ओळंबे (११६५)व सविता सदाशीव पाटकर(११०२) विजयी झाल्या. तर
वि.जा./भ.ज./वि.मा.प्र राखीव मतदार संघात एका जागेसाठी
विनायकराव गुलाबराव इंदोरे (१०७२),
इतर मागास वर्ग एका राखीव जागेसाठी
सहकार पॕनलचे अरुण प्रल्हादराव जवंजाळ(१०८३) विजयी झाले.अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॕनलचे विजेंद्र प्रल्हादराव तायडे हे यापूर्वी अविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहणी विटणकर यांनी काम पाहिले निवडणुकी प्रकीया करीता सर्व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button