मा. न्यायाधीश यांना निरोप समारंभ
mother. impeachment of the judge begins
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयामध्ये नुकताच मा दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर यांची बढती व बदली झाल्याने निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश एस.व्ही. निमसे हे होते. याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश जी.एस.बोरा, सरकारी अभियोक्ता हटकर मॅडम, मिलिंद येवले, मीना सोनवणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवातीला मा.न्यायाधीश जी. बी. औंधकर यांचे औक्षण व तिलक करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. औंधकर साहेब यांचा सपत्नी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मा. न्यायाधीश निमसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. दक्षता पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, संदीप जगताप, चंद्रकांत नाईक, अमित दायमा, उल्हास महाजन, सरकारी वकील मिलिंद येवले, सौ औंधकर मॅडम तसेच मा. न्यायाधीश बोरा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर आपला सत्कार स्वीकारताना मा. न्यायाधीश औंधकर साहेब यांनी आपल्या मनोगत सांगितले की, आपण सर्वांनी दिलेला निरोप समारंभ, माझ्यासाठी अमूल्य अशी भेट आहे.. सर्वांचे प्रेम मिळाले.श्री. निमसे साहेब, बोरा मॅडम तसेच न्यायालय कुटुंबातील सर्व सदस्यांचा आभारी आहे. तुमच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.यानंतर आपले अध्यक्ष भाषणात मा. न्यायाधीश निमसे साहेब यांनी सांगितले की, सर्वांना आपल्या मध्ये सामावून घेणारे , चांगली शिकवण , उत्तम मार्गदर्शन व सकारात्मक विचार आणि प्रत्येक अडचणी मध्ये खंबीरपणे सदैव पाठीशी असणारे साहेब म्हणून श्री औंधकर साहेब कायम स्मरणात राहतील. आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला असे साहेब मिळाले असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी तर आभार चारुशीला पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. अधीक्षक नितीन मोरे, संदीप भोंडे, किशोर अत्रे, पोलीस कर्मचारी आबा पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रयत्न केले.