लायन्स क्लब ऑफ सातारा MIDC ने महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

Lions Club of Satara MIDC celebrated Women's Day in a different way.

 

कराड विद्या मोरे
या निमित्ताने लायन्स क्लब सातारा MIDC व यशोदा शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने त्यांच्या शाळेमध्ये महिला स्टाफ यांचे सिव्हिल हॉस्पिटल सातारा व मेडिकल कॉलेज सातारा यांचे तर्फे ब्रेस्ट कॅन्सर चेकअप व शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय यांचे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर व स्त्री रोग तज्ञ डॉ स्नेहा सावळकर यांचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन कुलदीप मोहिते यांनी लायन्स क्लब च्या सेवकर्याची माहिती सभागृहामध्ये दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा दशरथ सगरे सर यांनी क्लब च्या उपक्रमाचे कौतुक केले व महिलांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील इंजिनिअरिंग आर्किटेक्ट फार्मसी व मॅनेजमेंट कॉलेज मधील 200 महिला स्टाफ याच्या करिता देखील हा उपक्रम घेण्याचे आवाहन केले.
लायन सुरक्षा कदम यांनी आभार मानले..
या कार्यक्रमामध्ये यशोदा शाळेमधील 60 पेक्षा जास्त महिला स्टाफ यांचे ब्रेस्ट चेक अप व 100 पेक्षा जास्त महिला व पुरुष स्टाफ यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या *कार्यक्रमा करिता क्लब खजिनदार ला भालचंद्र काळभोर उपस्थित होते तसेच महिला सभासद ला ज्योती मोहिते ,ला वृषाली गायकवाड, ला मेघना काळभोर, व ला राजेंद्र मोहिते ,ला डी वाय पाटील ,ला शिवाजीराव फडतरे, ला आनंदा गायकवाड, ला श्रीकांत तोडकर ,व ला बाळासाहेब महामुलकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन क्लब च्या नवीन सभासद लायन सुरक्षा कदम अतिशय सुंदर प्रकारे केले .

Related Articles

Back to top button