Akola news:ईद-ए-मिलाद निमित्त मुंडगाव येथे रक्तदान शिबिर,52 रक्तदात्यांनी केले रक्तदान
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोला:अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पयाम एक इंसानियत फाउंडेशन शाखा मुंडगाव यांच्या वतीने ईद ए मिलादून्नबी निमित्ताने भव्य भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील 52 तरुणांनी रक्तदानाचे केले.
या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठीत नागरिक, तरुण मंडळी, ग्राम पंचायत चे सरपंच मिना उईके, उपसरपंच तुषार पाचकोर, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा संघटक समीर पठाण पं.समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश वारकरी यांची उपस्थिती होती.तसेच अकोट ग्रामीणचे ठाणेदार संजय खंदाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौलाना उजेर, मौलाना अफसर, मौलाना साजीद, मौलाना मुस्तकिम, मौलाना इर्शाद, मौलाना अबरार, मौलाना शेख कय्युम,शेख, सरदार, रिजवान पठाण, नाजीम मुल्ला जी, मुस्ताक पठाण,शेख, इम्रान, अंनिस सौदागर, मुकिम कुरेशी,जावेद खान,अ. रहेमान,जिया सौदागर, नवनिर्वाचित ग्रां पंचायत सदस्य, अ.अजीज़, इम्रान खान,विलास ठाकरे,दिपक मुंडोकार,जुगल चिंचोळकार, उपस्थित होते.तसेच बिट जमदार भास्कर सांगळे, कांबळे यांची उपस्थिती होती.अशी माहिती शाखेचे पदाधिकारी ईबाखान पठाण, शेख, इरफान यांनी दिली.