Mumbai news:मनसे चांदीवली विभाग प्रभाग-१६४ उपशाखाप्रमुखपदी सिकंदर शेख
रिपोर्ट/अजय उपाध्याय
कुर्ला :महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे या संदर्भात काळ दिनांक ०३-०४-२०२४ रोजी कुर्ला चांदीवली प्रभाग-१६४ तीन नंबर खाडी येथील उपशाखाप्रमुखपदी सिकंदर शेख यांची नियुक्ती झाली. मनसेचे चांदीवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आणि याबाबत बोलताना सिकंदर शेख म्हणाले, पक्षाची ध्येय, धोरणे आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी, जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्नशील राहू.’ याकामी त्यांना प्रभाग -१६४ चेशाखाप्रमुख नरेश तारी, सब्बन हिंदुस्तानी यु ट्यूब चैनेल चे मालक सब्बन अली नक्कन अली कासमी आणि चांदीवली विधानसभेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि सर्व मनसे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.