अकोला:चांगल्या कार्याचा सन्मान इतरांना प्रेरणा देतो- उपविभागीय अधिकारी घुगे
अकोला:कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत केलेल्या
चांगल्या कार्याचा सन्मान
कर्मचाऱ्यांना प्रेरणा देतो असे प्रतिपादन विश्वनाथ जी घुगे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद अकोट यांनी केले. ते नगरपरिषद मध्ये महाराष्ट्र न.प. कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटना तसेच न.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोट यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी डॉ. नरेंद्र बेंबरे, मुख्याधिकारी नगर परिषद अकोट, प्रदीप रावणकर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य न.प. कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना मुंबई तसेच अध्यक्ष न प सहकारी पतसंस्था अकोट व प्रशासन अधिकारी सुधीर तरोळे यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात असलेला विजय स्तंभाचे पूजन मा. घुगे उपविभाग अधिकारी अकोट तसेच डॉ. नरेंद्र बेंबरे, मुख्याधिकारी नगरपरिषद अकोट यांचे शुभहस्ते पूजन करण्यात आले व यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अकोट नगर परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी निजामोद्दीन रफीयोद्दिन यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन मा.घुगे, उपविभागीय अधिकारी अकोट तसेच डॉ. बेंबरे मुख्याधिकारी नगर परिषद यांनी केला. यानंतर नगरपरिषद कर्मचारी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावणकर यांचे हस्ते धनादेश व साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. लेखा विभागामार्फत लेखाधिकारी योगेश मांदळे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संजय बेलूरकर यांनी केले.
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट