जिल्ह्यात ग्राहकदिन प्रशासकीय स्तरावर साजरा करावा* डॉ. अनिल देशमुख

अ.भा.ग्राहक पंचायत तर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन!

जळगांव *आबा सूर्यवंशी* २४ डिसेंबर ग्राहकदिन जिल्हाभर जनहितासाठी प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी दि.९ डिसेंबर रोजी पाचोरा उप विभागिय अधिकारी भूषण अहिरे , पुरवठा निरीक्षण अधिकारी सुषमा मेघश्याम उरकुडे यांना दिले आहे. या प्रसंगी पाचोरा तालुका अध्यक्ष संजय पाटील , तालुका संघटक ॲड. निलेश सूर्यवंशी उपस्थित होते.२४ डिसेंबर ग्राहकदिन साजरा करतांना या कार्यक्रमास रेशन दुकानदार, व्यापारी ,गॅस एजन्सी डीलर्स, वजनमाप निरीक्षक , प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी, पंचायत समिती , नगरपालिका , भमापन , पोलिस अधिकारी बांधकाम व्यावसायिक , मोबाईल कंपनी प्रतिनिधी , विमा कंपनी प्रतिनिधी , किराणा व भुसार माल विक्रेते , हॉटेल चालक ,दूध डेअरी व्यावसायिक ,बस डेपो – परिवहन विभाग, आरटीओ. अधिकारी, कृषी बियाणे व खते विक्रेते , ट्रॅव्हल कंपन्या, ऑनलाईन विक्री करणारे कंपनी प्रतिनिधी या सर्वांना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत ग्राहक हक्क व संरक्षण या बाबत माहिती मिळावी तसेच ग्राहक फसवणूक झाल्यास दंडात्मक कार्यवाही चे सर्वांचे प्रबोधन अभ्यास वर्ग घ्यावेत. माध्यमिक शाळा ,महाविद्यालय मधून ग्राहक प्रबोधन पथनाट्य ,निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा , व्हिडिओ गेम्स पासून विद्यार्थी जगतास परावृत्त करण्यासाठी पीपीटी प्रेझेंटेशन करावे. गॅस सिलिंडर लिक झाल्या नंतर होणारे अपघात बाबत डेमोस्ट्रेशन व मार्गदर्शन , सायबर क्राईमची वाढती गुन्हेगारी रोखणेसाठी उपाययोजना कराव्या या विषयीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मेलद्वारे पाठविण्यात आले आहे . जिल्ह्यात तालुका स्तरावर अ.भा. ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन संपूर्ण जिल्ह्यात दिनांक २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ग्राहक प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button