जावेद शेख पत्रकार यांची इमानदारी एकाचा हरवलेला मोबाईल वापस करून दाखवली माणुसकी
Javed Sheikh, journalist's honesty is always there, I have to return my mobile, I am a man of courage.
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा येथील शेख जावेद पत्रकार व लक्ष्मण आबा सूर्यवंशी काही कामानिमित्त प्रवीण सोडा जवळ गप्पा मारत असताना तेथे कामानिमित्त एक मुलगी व तिचा भाऊ आला असता त्यांचा साधारण १५ ते २० हजार किमंतीचा मोबाईल चुकून त्या ठिकाणी राहून गेला व ते तिथून निघून गेले. त्यानंतर जावेद शेख पत्रकार व लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या लक्षात आले असता जावेद शेख यांनी तो मोबाईल आपल्या जवळ घेऊन लगेच पाचोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे साहेब व पीएसआय श्री. प्रकाश चव्हाणके साहेब यांच्या ताब्यात दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भदाणे यांनी त्या मोबाईलवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमचा मोबाईल हरवला आहे त्यांना साहेबांनी सांगितले. तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या. लागलीच ती व्यक्ती पोलीस स्टेशनला आली असता मोबाईल खरोखर त्याचा आहे का याची खात्री करणे करता त्यांची माहिती घेतली. मोबाईल कोणत्या कंपनीचा व कशा कलरचा आहे त्यांनी सांगितले त्या वर्णन प्रमाणे हा तोच मोबाईल आहे याची खात्री करून तो मोबाईल हरवलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिला. यावेळी त्या व्यक्तीने पत्रकार जावेद शेख, लक्ष्मण आबा सूर्यवंशी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दीपक पाटील , समीर पाटील हे उपस्थित होते. आजही पत्रकारांमध्ये प्रामाणिकपणा व माणुसकीचे दर्शन घडून आले.