मणियार समाज भवनसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल. आ. किशोर आप्पा पाटील,मणियार समाज बिरादरी तर्फे सेवानिवृत्त उप शिक्षकाचा सत्कार!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)- मणियार बिरादरीच्या वतीने न्यू उर्दू हायस्कूल शाळेचे उप शिक्षक मो .इद्रीस अमानुल मणियार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम जळगांव जिल्हा मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांचे अध्यक्षतेत तर पाचोरा भडगांव मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार रोजी
बाहेरपुरा भागातील न्यू उर्दू हायस्कूल येथे इरफान मन्यार यांनी आयोजित केला होता.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास आ. किशोर आप्पा पाटील यांनी सत्कारार्थी इद्रिस मनीयार यांच्या शालेय कार्याचे कौतुक करून भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मणियार समाजाने त्यांचे स्वतंत्र समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही आ. किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
या प्रसंगी मुख्तार शहा, खलील शेख , जमील शेख. नसीर बागवान, शेख, इकबाल मण्यार, डॉ.शेख आताऊर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, सचिन सोमवंशी ,अजहर खान , गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील ,बशीर बागवान, सौदागर, ॲड. अमजद पठाण, रहीम बागवान, सादिक मण्यार, जावेद शेख,सैय्यद सद्दाम,साबीर पेंटर, इकबाल मण्यार, नझीम शेख,समद शेख,जावेद शेख यांचे सह मणियार बिरादरी व मुस्लिम समाज संघटनांचे पदाधिकारी, शाळेचे संचालक उपस्थित होते. मणियार बिरादरीच्या वतीने न्यू उर्दू हायस्कूलचे शिक्षक ईद्रीस मणियार यांना सेवानिवृत्ती निमित्ताने गौरविण्यात आले. आयोजक इरफान मणियार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.