कोयना सहकारी बँकेस १८४ लाखाचा नफा
Koyna Cooperative Bank's profit of 184 lakhs
कराड : विद्या मोरे
नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेची सांपतिक स्थिती भक्कम झाली असून बँकेचा नफा १८४ लाख व तरतुदी व कर वजा जाता बँकेस रु. ९०.२१ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे तर भागभांडवल ७.४३ कोटी, निधी१६.४४ कोटी, ठेवी रु.१८२.६८ कोटी, कर्ज १२८.३६ कोटी, सी आर ए आर १६.२० टक्के आहे. बँकेचा निव्वळ एन पी ए २.१९ टक्के तर बँकेचा एकूण व्यसाय ३११ कोटी झाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी दिली.
सन १९९६ साली कराड येथे सुरु झालेल्या कोयना सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली व पुणे जिल्हा असून बँकेच्या एकूण १२ शाखा कार्यरत आहे. बँकेचे सुसज्ज स्वमालकीची मुख्य कार्यालय इमारत असून आहे. बॅंकेचे मार्गदर्शक व माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) तसेच संस्थापक अॅड उदयसिंह पाटील यांचे नेतृत्वाखाली व बँकेचे संचालक मंडळ यांनी निस्वार्थपणे, विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करून आर बी आय च्या सर्व निकषाची पूर्तता केली आहे.बँक स्थापनेपासून नफ्यात आहे. बँकेस स्थापनेपासून सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेने ग्राहक सेवा व आधुनिक बँकिंग सुविधा देणेच्या हेतूने आय IMPS (मोबाईल बँकिंग) व UPI बँकिंगचा अवलंब केला आहे. तसेच ATM (डेबीटकार्ड), डिमांड ड्राफ्ट, RTGS/NEFT/ATM/CTS क्लिअरिंग / SMS/तसेच मिस्ड कॉल इत्यादी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. बँक नेहमीच तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध असून बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांचा सभासद, खातेदारांनी लाभ घ्यावा असे अवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी केले.