वेदांती दाणी लिखित व दिग्दर्शित आवाज हा लघुपट याविषयी
पुणे प्रतिनिधी – मंदार तळणीकर
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे…. ह्या ओळी सुरेश भटांच्या आहेत पण जेव्हा आवाज हा लघुपट आपण बघतो त्यावेळेस ह्यावेळी आठवल्या शिवाय राहत नाही.
या चित्रपटात अदितीचं एक गृहिणी म्हणून कॅरेक्टर आहे. अदितीचं लग्न ठरतं व सर्व साधारण धारणेप्रमाणे सगळं गोड गुलाबी वाटत नाही. त्यामध्ये सामाजिक कौटुंबिक अपेक्षांच्या ओझ्याने अदितीचा आवाज दबला जातो. ज्या ठिकाणी पितृसत्ताक पद्धतीचा बळी असलेल्या समाजात अजय व त्यांच्या घरच्यांवर प्रेम करता करता अदिती स्वतःच्या अस्तित्वाला टिकू शकेल का ? या प्रश्नाचा शोध म्हणजेच हा लघुपट.
आवाज हा लघुपट पाहिल्यानंतर हा चित्रपट प्रत्येक गृहिणीची गोष्ट वाटते.
जेव्हा आधी तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी व्हायला लागतात तेव्हा तिची होत असलेली घालमेल, कौटुंबिक जबाबदारी, घुटमळ अनुभवता येते.
छोट्याशा गोष्टीसाठी आणीबाणीच्या बाता करणारी अदिती जेव्हा सुरुवात ‘एक ही दिन से होती है ना ‘असे म्हणते तेव्हा त्या गोष्टीची भीषणता जाणवते.
पुरुषांप्रमाणेच बाईलाही एकाच वेळी कुटुंब प्रेम, सुख व उत्तम करियर स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये? असा प्रश्न भेडसावत असतो . ‘थोडीशी जिद्दी हू मै, थोडासा मुझको हे पाना सारा जहा ‘ हे गाणं काळजाला भिडत. पंधरा मिनिटाच्या या हिंदी लघुपटात एका बाईचा नगण्य वाटणाऱ्या दैनंदिन झुंझीचा त्रागा व त्रास अनुभवायला मिळतो. जागतिक महिला दिना निमित्त ‘हमरा मूवी ‘या युट्युब चॅनलवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण जरूर हा लघुपट बघायला हरकत नाही. त्यामध्ये एका बाईची कौटुंबिक व सामाजिक झुंज पाहायला मिळते.