पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ,एकाच रात्री तीन ठिकाणी जबरी चोरी

Thieves in Pimpalgaon Hareshwar and Warkhedi areas, thefts at three places in one night

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री तीन ज्वेलर्स दुकानात चोरट्यांनी सिनेमा स्टाईल चोरी केल्याने ग्रामस्थ आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २२ डिसेंबर च्या मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीसाई ज्वेलर्स पहुरकर व श्रीगुरुदत्त ज्वेलर्स जळगावकर यांच्या गावात असेलेल्या दोन दुकानांचे शटर फिल्मी स्टाईल मध्ये तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरटे चोरी करतांना सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी चक्क इको गाडीचा वापर केला आहे असं दिसून येत आहे. पिंपळगाव सह वरखेडी येथील ज्वेलर्स याच्या दुकानात चोरी झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. या चोरी मध्ये चोरट्यांनी मौल्यवान वस्तू, रोकड, चांदीचे दागिने, सोन्याची दागिने लंपास केल्याचे समजते. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. सदर घटनेची माहिती मिळतात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली तसेच पुढील घटनेचा तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे.

Related Articles

Back to top button