Akola news:रिपाइं (ए) चा वर्धापन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट ता.२८ : रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचा चा वर्धापन दिवस व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस अकोट तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे वतीने गुरुवार (ता.२७) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
.सदर कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेक्ष्वर,विदर्भ कार्याध्यक्ष राजेंद्र नितनवरे,अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिनदादा कोकणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष अजय प्रभे, महिला आघाडी अकोला जिल्हा कार्याध्यक्षा सरितादेवी मनोहर,जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक यांच्या प्रमुख उपस्थितीत व अकोट तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे व शहराध्यक्ष राजेश तेलगोटे यांच्या नेतृत्वात केक कापून तसेच पत्रकार बाळकृष्ण तळी, पत्रकार प्रकाश गायकी, पत्रकार नितीन तेलगोटे,सह असंख्य पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला.व त्यानंतर पक्षाचे वतीने अकोट ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे, बिस्किटे व गरीब महिलांना साडी चोळी व गरीब पुरुषांना दुप्पटे,वाटप करण्यात आले. तसेच अकोट तहसील ला नव्याने रुजू झालेले तहसीलदार चव्हाण याचा सुध्दा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी रिपाइं (ए) च्या कार्यकर्ते यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.यावेळी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सागर वडतकार, तालुका सचिव पंकज सुलताने,शहर सचिव गजानन इंगोले,शहर उपाध्यक्ष पंकज पळसपगार, अकोला तालुका महिला कार्याध्यक्षा अंतकला जुमळे, हिम्मत तेलगोटे, प्रदिप तेलगोटे, मंगेश तेलगोटे,ताई बाई तेलगोटे, उज्वला तेलगोटे, तालुका उपाध्यक्ष उमेश तेलगोटे, तालुका महिला उपाध्यक्षा गुहे, तालुका महिला सचिव इंगळे सह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन राजकुमार वानखडे यांनी तर आभारप्रदर्शन राजेश तेलगोटे यांनी मानले,