रात्री सि.एस.एम.टि. टर्मिनल्स वरून लागोपाठ सुटणाऱ्या अंबरनाथ लोकल ट्रेन बदलापूर पर्यंत प्रवर्तित करावी,बेस्ट सामाजिक संस्थेची मागणी
बदलापुर महाराष्ट्र से श्रीमती रेशमा अभिजीत सुर्वे की रिपोर्ट
दि.31जुलै:-
मध्य रेल्वे लोहमार्गावरील बदलापूर रेल्वे स्टेशन हे चाकरमान्यांच्या दृष्टीने अत्य महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबई -बदलापूरच्या अप-डाऊन दिशेने दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. रात्री 23:30 कर्जत लोकल नंतर 12:24 ची बदलापूर दिशेने येणारी लोकल आहे. या वेळेच्या मध्यंतरी लोकसेवा नसल्याने बदलापूर दिशेने प्रवास करण्यासाठी एक तास वाट बघावी लागते. या दरम्यान प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी या हेतूने आज बेस्ट सामाजिक संस्थेच्या वतीने स्टेशन प्रबंधक बदलापूर यांना मागणी निवेदन पत्र देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री वेळ 23:51 व 12:04 ला अंबरनाथ पर्यंत सुटणारी दोन्ही लोकल सेवा बदलापूर रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवर्तित करण्यात यावी
अशा स्वरूपाचे मागणी निवेदन पत्र देण्यात आले.
या विषयावर बदलापूरचे स्टेशन प्रबंधक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वरिष्ठ पातळीवर चर्चा विनिमय करून त्या दोन्ही गाड्या बदलापूर रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवर्तित करता येईल का? यासाठी नक्कीच प्रयत्न करू. जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय नक्कीच कमी होईल. अशा स्वरूपाचे आश्वासन दिले. या प्रसंगी बेस्ट सामाजिक संस्था बदलापूरचे पदाधिकारी, सदस्य, काही प्रवासी देखील उपस्थित होते.
यावी यासाठी निवेदन देण्यात आले ,यावेळी बदलापुर शिरगाव शिवसेना विभाग प्रमुख
श्री.बाळा पाटील साहेब,
युवा सेना उप शहर प्रमुख श्री.अभिजीत सुर्वे साहेब
संस्थेचे अध्यक्ष विशाल सांवत,
उपअध्यक्ष लक्ष्णन कोळी,
सचिव प्रसाद गडकर,
खजिनदार दिपक पाटील,
शंकर कोळी,बेलदार,नितीन जाधव,इतर सर्व सस्थेचे सभासद उपस्थित होतेl