आमदार रणधीर सावरकर यांच्या ” विकासाचा रथ ” कोणीच रोखू शकत नाही,खासदार अनुप धोत्रे यांचे मत
अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोला पूर्व मतदार संघातील दिनोडा वरूर व जाऊळका येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माननीय युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे व माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे व आमदार सावरकर यांचा स्तकार करण्यात आला.
मतदार संघाच्या विकासासाठी अथक परिश्रमातून निधि खेचून आणत आमदार रणधीर सावरकर यांनी “अकोला पूर्वची” एक नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ग्रामीण भागाचा केलेला अभ्यास पूर्ण विकास हा आज सर्वांसमोर आहे. आणि या पुढेही तेच आपल्या मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनवू शकतात. त्यामुळेच त्यांच्या विकासाचा रथ कोणी रोखू शकणार नाही. आशावाद युवा खासदार अनुप संजय धोत्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सावरकर यांनी मागील 10 वर्षात अकोला पूर्वच्याच नवे तर जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक मेहनत घेतली आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी , खेड्यापाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यात असलेली तळमळ मी जवळून पाहिली आहे.त्यांची ती विवेकबुद्धी ,कमी वेळात जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याची अभ्यासुवृती पाहून मी स्वतःही चकित होवून जातो.असेही खासदार अनुप धोत्रे यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित राजूभाऊ नागमते राजूभाऊ रावणकर सुरेश भाऊ शेळके विठ्ठल वाकोडे लोणकरंजी डागा सरपंच बानेतकर वरुड चे सरपंच पडोळे हरिभाऊ अवारे मनोहर ढोके डॉक्टर शेटे चेतन डोईफोडे बच्चू पाटील कडू विनोद मंगळे मधुभाऊ पाटकर दादाराव पेठे पंचायत समिती सदस्य रितेश तायडे अनुप साबळे मोहन सावरकर सतीश सावरकर काशीनाथ हिंगणकर प्रवीण डीक्कर मंगेश घुले बाळू पाटील धुमाळे अशोक झांबरे सुनील राजगुरू ज्ञानेश्वर आडे दत्तू पाटील गावंडे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते