सरपंच संतोष देशमुख यांचे मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या,अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रशासनाला निवेदन

आबा सूर्यवंशी

(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)

बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच आणि मराठा चवळीचे कार्यकर्ता संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची भर दिवसा निघुण हत्या करण्यात आली. ही लोकशाहीची हत्या आहे. ज्या आरोपींनी निरपराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींना स्थानीक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीयवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे वतिने भडगाव तहसीलदार शितल सोलाट, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी. बी. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरुन त्यांचेवर वचक बसेल. या घटनेला जबाबदार असणा-या बीड जिल्हयातील संबंधीत केज पोलीस अधिका-यांची चौकशी करुन त्यांचे वरही कायदेशीर कार्यवाही करावी. बीड जिल्हयामध्ये सातत्याने मराठा समाजावर अन्याय, अत्याचार करुन हल्ले घडवुन आणले जात आहेत. अशा समाज विघातक जातीयवादी नेत्यांचा बंदोबस्त मराठा समाज लवकरच करेल. बीड जिल्हयात सध्या सर्वत्र अशी चर्चा सुरु आहे की, बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री या घटनेचा मास्टर माईंड असल्याचे कळते. याची देखील चौकशी करण्यात यावी. आणि या संबंधीताचे मोबाईल लोकेशन सीडीआर काढुन योग्य ती कार्यवाही करावी. महाराष्ट्र सरकारने संपुर्ण मराठा समाजाला न्याय दयावा. अन्यथा लोकशाही व प्रशासनावरच विश्वास जनेतचा उडाल्याशिवाय राहणार नाही. सरपंच संतोष देशमुख यांचे खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवुन संतोश देशमुख यांचे कुटुंबाला आणि मराठा समाजाला न्याय दयावा. व त्यांचे कुटुंबाला शासनामार्फत आर्थिक मदत करण्यात यावी. अन्यथा राज्यभर अखिल भारतीय मराठा महासंघ रस्त्यावर उतरुन राज्य सरकारला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. अशा समाजघातक असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा लवकरात लवकर द्यावी . निवेदन देतांना अखिल भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी.बी.भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत देसले, उपाध्यक्ष निलेश पवार, कार्याध्यक्ष भूषण पवार, डी. डी. पाटील,चेतन पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील, अविनाश देशमुख, तुषार देशमुख, गणेश पाटील, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button