शास्वतशैली जीवनात महत्वाची,डॉ.अनिल देशमुख भडगांव तहसील कार्यालयात ग्राहकदिन कार्यक्रम संपन्न!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भडगांव तहसील कार्यालयात ग्राहकदिन कार्यक्रम संपन्न!
पाचोरा – भडगाव प्रतिनिधिव- व्यवहार करतांना ग्राहकहित जपणे महत्वाचे असते ग्राहक हा राजा आहे त्याची फसवणूक होऊ नये यासाठी जागतिक ग्राहक दिवस साजरा केला जातो. “शास्वत जीवन शैली कडे न्याय संक्रमण “हे ब्रीद वाक्य आहे, असे मार्गदर्शन डॉ .अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी ग्राहकदिन कार्यक्रमात व्यक्त केले. तहसिल कार्यालय भडगांव श्रीमती शितल सोलाट तहसिलदार यांचे अध्यक्षतेत तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात शासन आदेशा नुसार लोकगीत व पथनाट्रय यांचा समावेश करण्यात आला. शाहीर परमेश्वर सुर्यवंशी यांच्या पथकाने“शास्वत जिवन शैली, न्याय संक्रमण, ई.के.वाय. सी.या दोन बाबीवर पथनाट्रय सादर केले. यावेळी अ. भा. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष श्री. अनिल देशमुख पाचोरा यांनी शास्वत जीवनशैली संबंधी विविध उदाहरणं देत मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक डी. व्ही. अमृतकार, गोदाम व्यवस्थापक एस.एस. गढरी पुरवठा लिपीक एस. आर. पाटील व एम. एस. निकम, चेतन पाटील, जिल्हा कार्य कारीणीतील सुधाकर पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष सुरेश रोकडे, प्रा. सुरेशकोळी, दिनेश पाटील, आकाश पाटील, निलेश बडगुजर, गणेश अहिरे, रेशन दुकानदार संघटनेचे जयवंत पाटील, ग्राहक पंचायतचे सदस्य, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप डी. व्ही.अमृतकार यांनी केले

Related Articles

Back to top button