Akola news:गणगणे विद्यालय अकोट येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट : स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सूर्यनमस्कार हा नियमित केला पाहिजे व त्याचे जीवनात अनन्य साधारण असे महत्त्व आहे याविषयी माहिती शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
माघ महिन्यातील सप्तमी अर्थात रथसप्तमी या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो.या निमित्य आकोट मधील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके सादर करत सूर्याची प्रतिमा साकारली. आरोग्य सुदृढ व चांगले राहण्यासाठी सूर्यनमस्कार नियमित करणे गरजेचे असते असा संदेश यातून विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल काकडे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सूर्यनमस्कार यामुळे आपले जीवन बदलून जाऊ शकते त्यामुळे नियमित दररोज दहा सूर्यनमस्कार घातले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद लहाने आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे यांनी केले.