Akola news:अकोट रोटरीने दिला,सडक सुरक्षा, जीवन रक्षा चा मंत्र
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
स्थानिक अकोट शहरात एक सामाजीक संस्था म्हणुन अकोट रोटरी क्ल्ब निरंतर कार्यरत आहे. गेल्या 8 वर्षापासुन रस्ता सुरक्षा अभियान,अकोट रोटरी, शेतकरी मोटर्स जनजागृती करत आहेत त्या अंतर्गत रोटरी चे माजी अध्यक्ष सुरेश भाई सेदानी, लालबहादूर शास्त्री कॉन्व्हेंट चे प्राचार्य तथा रोटरीचे माजी अध्यक्ष श्यामजी शर्मा हयांचे हस्ते लाल बहादूर शास्त्री कॉन्व्हेंट जवळ,अकोला रोड वर सडक सुरक्षा जीवन रक्षा हया फलकाचे नेहमी करीता अनावरण करण्यात आले. राईड सेफ इंडीया हया मिशन अंतर्गत राईड सेफ प्रोग्राम,अपघात विमा जनजागृती अभियान, वाहन चालकांचे आरोग्य तथा नेत्र तपासणी शिबीर असे अनेक प्रकल्प अकोट रोटरी क्लब नेहमी घेत असते. हया फलकामुळे रस्ता सुरक्षेबद्दल नियमीत जनजागृती होत राहील. लोकांना जीवनाचे रक्षण करायचं असेल तर नेहमी रस्त्यावर सुरक्षित वाहन चालावेच लागेल असा संदेश नेहमी लोकांचे निदर्शनास येईल त्यामुळे निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कारण आज रोजी अपघाताचे प्रमाण वाढत असुन दररोज कित्येक अपघात होत आहेत . अश्या प्रकारचे कायम स्वरुपी फलक लावुन रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती करणारा हा दुसरा प्रसंग असुन पाहुण्यानीं तथा माजी अध्यक्ष्यांनी अकोट रोटरीचे अध्यक्ष माधव काळे , सचिव नंदकिशोर शेगोकार हयांचे कौतुक केले. हयावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष उद्धवराव गणगणे,आयपीपी संजयजी बोरोडे, सदस्य आंनद भोरे,अशोक गट्टानी कार्यक्रमाकरीता शेतकरी मोटर्स चे अजिंक्य् नाथे. क्रीष्णाजी नाथे, गणेश मेंढे, भारत अंभोरे, निवृत्ती हाडोळे हयांनी अथक प्रर्यत्न् केले. शेतकरी मोटर्स व पुजा टायर्स हयांनी प्रायोजीकता दिली.अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.