Akola news:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अकोट नगरपरिषद समोर लक्षवेधी आंदोलन
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट शहरातील सोमवार वेस अशोक नगर येथील संरक्षण भिंत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी अकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी कारवाई करण्याचे उदेशाने दि.30जुन रोजी सकाळी 11वाजता अकोट तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे वतीने एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे.सदर आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिनदादा कोकणे यांच्या मार्गदर्शनात तथा अकोला जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, जिल्हा महासचिव आनंदा कोकणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिमाताई सरदार, जिल्हा कार्याध्यक्षा सरितादेवी मनोहर यांच्या नेतृत्वात सोमवार वेस अशोक नगर येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोट शहराध्यक्ष राजेश तेलगोटे, तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे, ओ बी सी सेल तालुकाध्यक्ष सागर वडतकार, तालुका उपाध्यक्ष उमेश तेलगोटे,महिला आघाडी अकोट तालुका सचिव शारदा इंगळे, तालुका उपाध्यक्षा अनुरिती गुहे यांनी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले . तसेच जर दि. 14ऑगस्ट पर्यंत जर काम करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर दि.15 ऑगस्ट रोजी खाई नदीत अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी पंजाबराव किर्दक, गौतम अनभोरे, उध्दव कोकणे, संतोष कोकणे,रविना मनोहरे,वर्षा रामटेके,नंदा कोकणे, अंतकला जुमळे, पदाधिकारी,व कार्यकर्ते सह नगरसेवक मंगेश चिखले, विशाल भगत सह बहुसंख्येने नागरिकांनी मंडपास भेटी दिल्या.