Akola news:कबीरच्या आठवणीने डोळे पाणावले,एमरा व विरवाणी परिवाराच्या आरोग्य व रक्तदान शिबीराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट,ता.२९-आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन म्हणजेच एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांचे दिवंगत सुपुत्र कबीरच्या आठवणीने अकोटच्या आरोग्य व रक्तदान शिबीरात मित्रपरिवाराचे डोळे पाणावले.एमरा व विरवाणी परिवाराने मंगळवार(ता.२७)ला आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घेतला तर शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करुन पुण्यकार्य केले.गतवर्षी स्व.कबीर विरवाणीचे असाध्य आजाराने निधन झाल्यावर कुटूंबियांनी त्याचे मरणोत्तर नेत्रदान केले होते.स्व.कबीर याच्या वर्षश्राध्दानिमित्त व एमराचे राष्ट्रीय महासचिव स्व.भावेश सोळंकी यांच्या स्मरणार्थ अकोटला मंगळवार (ता.२७)ला स्थानिक झुनझुनवाला अतिथीगृहात आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन संजय विरवाणी यांनी केले होते.या शिबीराचे उदघाटन प्रतिष्ठित व्यापारी मनोहरलाल विरवाणी यांच्या हस्ते करण्यात आले.या आरोग्य शिबीरात वैद्यकीय तज्ज्ञांनी गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना पूढील उपचारार्थ वैद्यकीय सल्ला दिला.तर असंख्य रुग्णांचे इसीजी मोफत काढून देण्यात आले.या शिबीराला डॉ.सुरज व्यवहारे,डॉ.विशाल इंगोले,डॉ.अमोल राजगुरु,डॉ.भावेश गुरुदासणी यांनी आरोग्य सेवा दिली.रक्तदान शिबीरात अकोल्यातील श्री साई रक्तपेढीने सेवा दिली.शेकडो निरोगी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.रक्तदाते व निमंत्रितांसाठी चहा-पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबीराला सर्वश्री यवतमाळ येथील लालचंद देवानी,नेभनदास मोटवाणी,रामचंद्र पारवाणी,अशोक विरवाणी,मनोहर कोदवाणी,मोतीराम तेजवाणी,इंद्रलाल जेस्वाणी,नेभनदास जेस्वाणी,जितू जेस्वाणी,सँमसंगचे वितरक व शाकंभरी सेल्सचे मोहीत धानुका,राठी इंटरप्राईजेसचे व्यवस्थापक मयुर पनपालिया आदी मान्यवर पाहूण्यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतूक केले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गेश रामनानी,रवि विरवाणी,मुकेश जेस्वाणी,तेजुराम मंगवानी,बंटी लालवाणी,सन्नी जाधवानी,संतोष जेस्वाणी,श्याम संताणी,प्रमोद गोंडचर,सागर बोरोडे,अविनाश विरवाणी,हर्ष विरवाणी आणि संजय विरवाणी मित्र परिवाराच्या समस्त कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.