फ्रीडम स्कूलच्या प्रज्ञावान विद्यार्थिनीचा ,पालकांसह शिक्षिकेचा सत्कार
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोट :-स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल, अकोट येथील वर्ग 6वी ची इन्स्पायर अवॉर्ड नामांकन प्राप्त विद्यार्थिनी कु.सोनाक्षी वीरेंद्र इंगळे,तिचे आईवडिल तसेच विज्ञान मार्गदर्शक शिक्षिका कु.मयुरी सुभाष अकोटकर यांचा अकोट नगर परीषद अकोट द्वारा संचालित न .प. उर्दू वरि.प्राथ.शाळा क्र. 5 अकोट जि.अकोला तर्फे आयोजित समारंभात सत्कार करण्यात आला.या समारंभास शाळेचे मुख्याध्याप पंचायत समिती अकोट चे विस्तार अधिकारी (शिक्षण ) श्री. गजानन सावरकर , गटशिक्षणाधिकारी श्री. मधुकर सूर्यवंशी , गटविकास अधिकारी श्री. कालिदास तापी नगरपरिषद प्रशासन अधिकारी अंबादास लाघे तसेच गटसाधन व्यक्ती तृप्ती बिजवे, विज्ञान अध्यापक मंडळ अकोट चे अध्यक्ष मनीष निखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासन अधिकारी अंबादास लाघे यांच्या हस्ते कु. सोनाक्षी विरेंद्र इंगळे तसेच मार्गदर्शक शिक्षिका मयुरी अकोटकर यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे,संस्था सचिव निलेश झाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. अरुणा ताले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी सोनाक्षी इंगळे व मयुरी अकोटकर यांचे फ्रीडम परिवारातर्फे अभिनंदन केले.असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळवण्यात आले.