फ्रीडम इंग्लिश स्कूल अकोट येथे ग्रॅज्युएशन डे साजरा
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आकोट :- स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूल गजानन नगर आकोट येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या वर्ग सीनियर केजी चा ग्रॅज्युएशन डे (दीक्षांत समारंभ )मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कुंकुम तिलक, हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे , शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे,संस्थेचे सचिव निलेश झाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले, फ्रीडम मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. रश्मी करुले, पर्यवेक्षक विजय रेवस्कार,निखिल अनोकार, अश्विनी ठोकळ, वर्षा महल्ले, शारदा चांदुरकर, राखी वांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिनियर केजी च्या 75 विद्यार्थ्यांना या दिक्षांत समारंभात विशिष्ट सुंदर पोशाखात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या अपूर्व सोहळ्यास पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . दीक्षांत समारंभा नंतर सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले.पालक व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व शीतपेयाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा महल्ले यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नर्सरी ते सीनियर के जी प्रवासाची शाळेतील काही प्रसंग आपल्या भाषणांमधून टीपले,त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले तसेच त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पूजा डाबेराव व ऐश्वर्या बोडखे तर आभार प्रदर्शन पूजा बेराड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख वर्षा महल्ले,
शिक्षिका माधुरी मगर, संध्या अपाले,कांचन धुराटे, शितल टेवरे, ज्योत्स्ना लहाने तसेच क्रीडा शिक्षक विक्रांत चंदनशिव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .