अकोला के अकोट तहसीलदार यांनी सुधारित पारित केलेल्या आदेशाची कर्मचाऱ्यांनकडून पायमल्ली…
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोला जिल्हाधीकरी यांचे आदेशानुसार व अकोट तहसीलदार यांनी दि.10/4/2023 ला सुधारित पारित केलेल्या आदेश प्रमाणे गाझीपुर बोर्डी फाटा गौणखनिज चेकपोस्टवर सकाळी 7 ते दुपारी 1 वाजे परंत 1 कोतवाल,1 तलाठी असे दोन कर्मचारी व दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 1 कोतवाल,1 तलाठी असे पुन्हा दोन कर्मचारी यांची आळीपाळीने गिट्टी,मुरूम,बद्री,वाळु, अवैध वाहतुकीवर आळा घालून व फौजदारी कारवाई करणेकरिता गाड्यांच्या तपासणीसाठी दिवटी लावलेली आहे.गैरहजर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणेसाठी नियंत्रण प्रमुख,व पथक प्रमुख,नेमले आहेत.व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट सुधारित पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे.अकोट तहसीलदार यांनी सुधारित पारित केलेल्या आदेशात दर सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपरंत राजेश बोकाडे तलाठी व वंदना भास्कर कोतवाल,पथक प्रमुख सायरे मंडळ अधिकारी यांचे दिवटी लावलेली आहे.मात्र या आदेशाचे कुठलेही पालन होतांना दिसत नाही आदेशात नमूद असलेल्या कर्मचारी पैकी महिला कोतवाल वंदना भास्कर व 1 होमगार्ड असेचेकपोस्टवर हजर असतात या पैकी तलाठी राजेश बोकाडे हे दिवटीवर कधीच हजर राहत नाहीत,कदाचित उशिरा पाशीरा हजर झालेही तर 1 ते 2 तास बसले की निघून जातात,असा प्रकार दर सोमवारी घडत आहे.तलाठी बोकाडे यांचेकडे रामापुर साझ्याचे काम दिले आहे तेथे सुद्धा तलाठी बोकाडे हे रामापूर येथे मुख्यालयी कधीच हजर नसतात.तलाठी बोकाडे हे अकोला येथे राहतात तेथून अपडाऊन करून हप्त्यातून दोन,तीन दिवस दिवटीवर येतात.गौणखनिज चेकपोस्टवर सुद्धा हाच प्रकार वेळोवेळी घडत आहे.महिला कोतवाल कर्मचारी यांची दिवटी लावली असतांना महिला कर्मचारी चेकपोस्टवर आपली दिवटी पार पडतांना दिसतात.तर तलाठी बोकाडे हे चेकपोस्टवर स्वता हजर राहून आपली दिवटी का करू शकत नाहीत ही उल्लेखनीय बाब आहे.तलाठी बोकाडे यांनी पहिले कुटासा साझ्याचे काम दिले होते तिथं त्यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले होते.पुन्हा आता रामापूर साझ्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.मात्र रामापूर येथे सुद्धा मुख्यालयी,व चेकपोस्टवर दिवटी असतांना सुद्धा वेळोवेळी गैरहजर राहणे पहावयास मिळत आहे.रामापूरचे तलाठी राजेश बोकाडे यांचे विरुद्ध मुख्यालयी हजर राहत नसल्या बाबत लेखी तक्रारी झाल्या होत्या याची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन चौकशी व पाहणी केली होती.व तलाठी हे मुख्यालयी हजर राहत नसून नागरिकांची कामे वेळेवर करीत नसल्याचे निष्पन्न झाले होते.व त्यांच्या विरुद्ध अकोट तहसीलदार निलेश मडके यांनी 1 वेतनवाढ कपात करण्याचा आदेश केला आहे व त्यांची वेतनवाढ कपात करण्यात आली आहे.तरी सुद्धा तलाठी बोकाडे यांच्याकडून वरिष्ठांचे आदेशाचे पालन होतांना दिसत नाही.तलाठी बोकाडे यांची हम करेसो कायदा ही भूमिका सुरूच आहे.या बाबत चेकपोस्टवरील हजर असलेले कर्मचारी यांचे जिओट्याकिंग फोटो,व्हिडीओ,वरिष्ठ अधिकरी,नेमलेले नियंत्रण प्रमुख,पथक प्रमुख यांना टाकले आहेत,या बाबत पेपरला बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत,तरी सुद्धा आज परंत वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन कामचुकार पणा करणाऱ्या व आदेशाचे पालन न करून गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी यांच्यावर मात्र कुठलीही कडक कारवाई करण्यात आली नाही.उलट गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमलेलले नियंत्रण प्रमुख,पथक प्रमुख यांच्याकडून पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.तरी याकडे वरिष्ठ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांनी लक्ष देऊन गैरहजर राहणाऱ्या,व कामचुकार कर्मचारी विरुद्ध कडक कारवाई करणे गरजेचे आहे.