अमरावती:अचलपूर येथुन एकमेव लोकसभा उमेदवार आहे रविभाऊ वानखडे
अचलपूर परतवाडा येथील 90 हजार मतदार ठरणार निर्णायक*
अचलपुर संवाददाता सैयद गनी की विशेष रिपोर्ट,
अचलपुर अमरावती महाराष्ट्र
(अचलपुर)
स्थानिक जिवनपुरा अचलपूर निवासी रविभाऊ वानखडे मागील पंधरा वर्षांपासून समाजकार्य व राजकारणात सक्रिय आहे . नेहमीच अमरावती जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधवांना तसेच गोरं गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात दिसत असतात . भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली अचलपुर गांधीपुल येथील ऐतिहासिक बौद्ध दीक्षाभूमी स्मारकाची अचलपुर नगर परिषद प्रशासनाच्या असेसमेंट वर 13 ऐप्रिल 2022 पर्यंत नोंद नव्हती . दीक्षाभूमी स्मारकाची शासकीय नोंद नसल्याने तेथील हवा तसा विकास होत नव्हता . अचलपूर येथील बौद्ध दीक्षाभूमी स्मारकाची नगर परिषद असेसमेंट वर नोंद अमरावती जिल्ह्यातील बडे बडे नेते करू शकले नाही . त्या बौद्ध दीक्षाभूमी स्मारकाची अचलपुर नगर परिषद असेसमेंट वरील नोंद रविभाऊ वानखडे यांनी 13 ऐप्रिल 2022 रोजी केलेल्या एक दिवसीय उपोषणातुन सर्व बौद्ध समाज बांधवांना सोबत घेऊन करुण दाखवली होती . त्यामुळे रविभाऊ वानखडे यांची बौद्ध समाजात आदराची प्रतिमा आहे . जिथे तिथे बौद्ध विहार नाही . अशा परिसरातील बौद्ध समाज बांधव व समंधीत अधिकारी यांचा समन्वय साधून समाज कल्याण विभाग मार्फत दलीत वस्ती सुधार निधीतुन अनेक ठिकाणी रविभाऊ वानखडे यांच्या पुढाकाराने बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू झाले आहे . रविभाऊ वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील जनतेबरोबर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चांगले समंध बनुन ठेवले आहे . रविभाऊ वानखडे यांनी अनेकदा शेतकरी , शेतमजूर , सुशिक्षित बेरोजगार , विद्यार्थी , व्यापारी तसेच गोरं गरीब जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी अनेक आंदोलने केली आहे . रविभाऊ वानखडे यांनी 2016 मध्ये अचलपूर नगर परिषद अंतर्गत जिवनपुरा वार्डातुन नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती . 2019 मध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघातुन आमदार पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होते . अमरावती जिल्ह्यातील राजकीय पक्षातील नेत्यांशी रविभाऊ वानखडे यांचे राजकीय मतभेद असले तरी सर्वांशी वैयक्तिक समंध चांगले आहे . अचलपूर जिल्हा निर्मीती व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नेहमीच आंदोलनात सक्रिय सहभागी असतात . रविभाऊ वानखडे यांना आमदार रवि राणा यांच्या परीवारातील जवळचे सदस्य म्हणून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओळखले जाते . खासदार नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे . खासदार नवनीत राणा भारतीय जनता पक्षात गेल्याने रविभाऊ वानखडे यांनी आपली वेगळी भुमिका घेतली आहे . रविभाऊ वानखडे यांच्या भुमीकेमुळे बौद्ध समाजातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे . अचलपूर परतवाडा शहरात 90 हजारच्या वर मतदार असुन रविभाऊ वानखडे अचलपूर येथुन लोकसभा निवडणूकीच्या मैदानात एकमेव अपक्ष उमेदवार आहे . रविभाऊ वानखडे यांना टेबल चिन्ह मिळाले असुन त्यांची 26 नंबरची बटन आहे . रविभाऊ वानखडे यांचा अमरावती जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधवांशी तगडा जनसंपर्क असल्याने काॅग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची मोठ्या प्रमाणात अळचन निर्माण होऊ शकते . रविभाऊ वानखडे यांच्या उमेदवारीमुळे कोणाला फायदा व कोणाला नुकसान होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे .