अमरावती:शिव महापुराण कथेसाठी जिवनपुरा अचलपुर बस स्थानक व परतवाडा बस स्थानक येथुन 10 बसेसची व्यवस्था

हिंद एकता टाइम्स अचलपुर संवाददाता सैयद गनी की विशेष रिपोर्ट

अचलपुर/अमरावती महाराष्ट्र,युवा स्वाभिमान पार्टी चे विद्यार्थी जिल्हा संपर्क प्रमुख नितीनभाऊ यादव यांनी युवा स्वाभिमान पार्टी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनात दीनांक 13/12/2023 रोजी परतवाडा आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले होते . निवेदनामध्ये खासदार सौ नवनीतजी राणा व आमदार रविभाऊ राणा जी यांच्या मार्गदर्शनात विश्वविख्यात शिव पुराण कथा वाचक परमपूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा जी यांच्या मधुर वाणीतून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकुमार जाजोदीया जी यांनी शिव महापुराण कथेचे आयोजन हनुमान गढी छत्रीतलाव अमरावती येथे केले आहे . कथा ऐकण्यासाठी अचलपुर परतवाडा शहर व ग्रामीण भागातील हजारो भाविक भक्त कथा ऐकण्यासाठी जाणार आहे . भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये . याकरिता जिवनपुरा अचलपुर बस स्थानक येथुन पाच बसेस व परतवाडा बस स्थानक येथुन पाच बसेसची व्यवस्था करावी तसेच अचलपुर परतवाडा शहर व ग्रामीण भागातील इतर भागातुन देखील शक्य होईल तसी बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली . त्या अनुषंगाने परतवाडा आगार व्यवस्थापक यांनी दीनांक 14/12/2023 रोजी आपल्या पत्राद्वारे दीनांक 16/12/2023 ते 20/12/2023 पर्यंत शिव महापुराण कथेच्या शामियाना पर्यत जिवनपुरा अचलपुर बस स्थानक येथुन पाच बसेस , परतवाडा बस स्थानक येथुन पाच बसेस , धारणी येथुन दोन बसेसची व्यवस्था सकाळी 08 वाजता सुरू करण्यात आली आहे . बस सेवा व शिव महापुराण कथा संदर्भात अधिक माहितीसाठी उपेनभाऊ बछले 9405320792 , रविंद्रभाऊ गंवई 9422556553 , नितीनभाऊ यादव 9561661413 , रविभाऊ वानखडे 9561287617 , मायाताई धवने 7057901014 , सारिकाताई बटुले 9623921201 , राजेशभाऊ गावंडे 9665481156 निशांत भाऊ कास्देकर 8308300614 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button