फ्रीडम मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
आकोट :- स्थानिक फ्रीडम मराठी शाळा,आकोट येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कुंकुम तिलक, हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे ,
शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे,संस्थेचे सचिव निलेश झाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी करुले, पर्यवेक्षक विजय रेवस्कार,शारदा चांदूरकर,वर्षा चोरोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष तथा सर्व पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा चोरोडे यांनी केले. सहाय्यक शिक्षिका सोनल बोडखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन कल्याणी राऊत व आभार प्रदर्शन मंगल कतोरे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे।