हिवरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा. प्रतिनिधी शोएब खान

तेलारा.तालुक्यातील हिवरखेड परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजान ईद उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहाची साधना केल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी ईद हा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला सावळदबारा सकाळी दहा वाजता ईदची सामूहिक नमाज येथील ईदगाह यते पार पडली मौलाना पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नमाज पठनासाठी परिसरातील मुस्लिम बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते ईदची नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांच्या गळा भेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या रमजान ईद या दिवसाला ईद.उल.फित्र असेही म्हणतात फित्र म्हणजे दान करणे म्हणून रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रूपात दान केले जाते म्हणून मुस्लिम बांधव वर्षभरापासून या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात महिनाभर अगदी कडक उपवास रोजा करून ईद चा चंद्र पाहून हा उपवास सोडला जातो व गरिबांना अन्नदान वस्त्रदान धनदान दिले जाते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button