अकोला:जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी वर असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीला भरघोस यश प्राप्त होणार असून निवडणूक आव्हान म्हणून स्वीकारली असून अनुप धोत्रे हे विजयी करण्याचा संकल्प महायुतीच्या कार्यकर्ते व अकोल्यात लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जात-पाच धर्म सोडून विकासासाठी निर्णय घेतले आहे
महाराष्ट्र अकोला
मोहम्मद जुनैद
अकोला:जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी वर असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीला भरघोस यश प्राप्त होणार असून निवडणूक आव्हान म्हणून स्वीकारली असून अनुप धोत्रे हे विजयी करण्याचा संकल्प महायुतीच्या कार्यकर्ते व अकोल्यात लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जात-पाच धर्म सोडून विकासासाठी निर्णय घेतले आहे मतदारांना मतदान केंद्रावर आणा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले
रतनलाल प्लॉट येथील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार कार्यालया महायुती हा विकसित संकल्प नामा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर हे होते तर मंचावर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया विजय देशमुख कृष्णा अंधारे किशोर पाटील तेजराव थोरात जयंत मसने संदीप पाटील अश्विन नवले विठ्ठल सरप, डॉक्टर रणजीत सपकाळ श्रावण इंगळे डॉक्टर अशोक ओलबे हरीश आलीम चंदानी, वसंत बाचोका कृष्णा शर्मा उमेश मालू आधी मंचावर विराजमान होते.
वीस हजार नागरिकांशी संवाद साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांना अपेक्षित कामे व शहरातील विविध जातपात धर्मातील नागरिकांशी विकास कामा संदर्भात विचार जाणून घेऊन प्रदेश आणि राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे तसेच जिल्हा महायुतीकडे नागरिकांचे मत संग्रह करण्यात आले अकोला जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विकसित भारत संकल्पना आम्हा संदर्भात पेटी लावण्यात आली होती त्या पेटीच्या अनुषंगाने संकल्पना व प्रदेशाकडे पाठवण्यात आला आहे.
यावेळी गोपी किसन बाजोरिया यांनी महायुती चा विजय असो खासदार संजय धोत्रे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्याने अनुप धोत्रे विजय होणार असून विकास आणि सामाजिक दायित्व विचारसरणी व मतदारांची सहज उपलब्धता यामुळे महायुतीचा उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असा विश्वास माजी आमदार बाजोरिया यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती कोणतीही निवडणूक ही आव्हान म्हणून व निवडणुकीमध्ये कष्ट करून मतदार राजा हा निवडणुकी मधला महत्त्वाचा घटक असून गेल्या 30 वर्षापासून जनता जनार्दन महायुतीच्या पाठीशी असून अकोलेकर आमचे आहेत त्यांच्या भावना त्यांचे इच्छा व त्यांच्या विश्वास आमच्यावर असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार यांच्या कामावर व खासदार संजय धोत्रे यांची कार्यशैलीमुळे हा विजय होणारच कार्यकर्ता हा हनुमान असून त्यांच्या बळावर आम्हीही निवडणूक जिंकणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रास्ताविक आमदार हरीश पिंपळे यांनी केले तर संचालन गिरीश जोशी यांनी केले यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रसार माध्यमातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अवकाली पावसामुळे नुकसान झाला आहे या संदर्भात सुद्धा राज्य शासनाकडे पाठपुरावा भाजपा महायुतीचे पदाधिकारी करत असून लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या पाठीशी उभे असल्याची गवाई महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आभार प्रदर्शन विठ्ठल सरप यांनी केले.