Akola:अकोट शहर पोलीसां कडुन दुकान फोडणा-या आरोपीस रंगेहात पकडुन चोरी केलेले नगदी ३००/- व बुलढाणा येथील चोरी केलेली ५०,०००/- रू ची मोटारसायकलवा गुन्हा उघडकीस आणुन जेलबंद करण्यात आले
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
पोलीस स्टेशन अकोट शहर सिमे अंतर्गत येत असलेल्या अनिल प्रल्हाद सावरकर रा. हाडोळे प्लॉट अकोट जि अकोला यांचे मालकीची दर्यापुर रोडवरील गुरुमाउली ऑटोमोबाइल्स या दुकानाचे मागील बाजुचा दरवाजा तोडुन दुकानात प्रवेश करून दुकानातील काउंटरचे गल्यातील आरोपीने नगदी ३००/- रू चोरून नेले तसेच संतोष मारोतीराव टावरे यांचे अश्वीनी ट्रेडर्स नावाच्या दुकानातील शटर लोखंडी टामीने वाकवुन दुकानात प्रवेश करून नमुद आरोपी चोरी करतांना रंगेहात मीळुन आला वरून त्यास लोकांच्या मदतीने पकडुन अनिल सावरकर यांचे तोंडी फिर्याद वरून आरोपी आकाश उर्फ सुरेंन्द्र सुभाष इंगोले वय २९ वर्ष रा. काठीपुरा सेंट्रल बँकेजवळ अंजनगाव सुर्जी जि. अमरावती यांचे विरूध्द पो.स्टे. ला अपन १४६/२४ कलम ४६१,३८०,५११ भादंवीचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्हयात विचारपुस केली असता त्याने बुलढाणा बस स्थानक येथील चोरी केलेली होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल कं. एम एच २८ बी. जी. ६६४६ किंमत ५०,०००/- चोरी केल्याची कबुली दिल्याने गुन्हा उघडकीस आणला आहे. वरून आरोपीला अटक करून अकोट कोर्ट येथे हजर केले असता मा. कोर्टाने एम.सी. आर. दिल्याने त्यास अकोला जेलबंद केले.
सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक श्री. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. अख्तर शेख, पोहेकॉ राजेश वसे, पोहेकॉ. चंद्रप्रकाश सोळंके, पोहेकॉ. गणेश सोळंके, पो. कॉ. सागर मोरे, पो.कॉ. रवी सदांशिव पो. कॉ. मनिष कुलट, पो. कॉ. विशाल हिवरे, पो. कॉ. कपील राठोड, ए.एस.आय कुरकुरे, यांनी केली आहे.