सामनेरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा म. गांधी विद्यालयाचे २५ वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र

Alumni reunion of Samner M. Gandhi Vidyalaya classmates came together after 25 years

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि)
सामनेर ता. पाचोरा – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचलित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्यां १०वी १९८० – ९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे उत्साहपूर्व वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षानंतर एकमेकांना भेटले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी महेंद्र साळुंखे, प्रमोद पाटील व स्वप्निल शिरोळे यांनी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकत्र करून स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात परिसर सुशोभित करण्यात आला होता रांगोळ्या,स्वागताचे बॅनर आदीचे नियोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन भारती सोंनकुळ, सुरेखा पाटील, भारती पाटील, वैशाली पाटील, जागृती डांबरे पितांबर पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, पिंटू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दहावीच्या बॅचचे काही माजी विद्यार्थी हे भारतीय सैन्य दलातील भूषण पाटील, दीपक कैलास पाटील ,दीपक फुलचंद पाटील ,राहुल सोनकूळ सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्या निमित्त त्यांचा संदीप पाटील सचिन चिंचोले गोपीचंद पाटील दिलीप पाटील प्रमोद साळुंखे वासुदेव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये, राजेंद्र बाविस्कर, योगेश जाधव ,वासुदेव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण पाटील, गोपीचंद पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, स्वाती पाटील, मीना पाटील, जागृती पाटील, मनीषा पाटील ,सुलोचना पाटील, भारती पाटील, सुनंदा पाटील, मीनाक्षी पाटील ,सुनीता पाटील, कल्पना पाटील ,भावना चव्हाण असे डॉक्टर शिक्षक, मॅनेजर, आर्मी,नेव्ही इंजिनियर, ग्रामसेवक आरोग्य सेवक, आदर्श शेतकरी , व्यावसायिक , वाहक विविध पदावर कार्यरत असले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शालेय आठवणींना उजाळा दिला शाळेतील काही गंमतदार प्रसंग काहींनी व्यक्त केले. शालेय जीवनातील आनंद लुटला एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत मित्र-मैत्रिणींनी निरोप घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील, सूत्रसंचालन महेंद्र साळुंखे तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button