अकोला:इज्तेमात जाणाऱ्या नागरिकांसाठी हिवरखेड टी पॉइंट वर सेवा,हिवरखेड मुस्लिम बांधवांचा उपक्रम, १५ वर्ष पासून सेवा आज इस्तेमा समापन
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
हिवरखेड : 18 फेब्रुवारी रविवार रोजी आलेवाडी ईज्तेमा येथे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांन करिता अल्पोहाराची व्यवस्था करून सेवा देण्यात आली.सातत्याने १५ वर्षापासून
या इज्तेमाकरिता हिवरखेड चे नागरिक दरवर्षी तीन दिवसीय इज्तेमा साठी जाणाऱ्या नागरिकांना हिवरखेड व आकोला,बेलखेड तेल्हारा,तळेगाव गोर्धा ,आकोट,दर्यापूर ,अमरावती,अचलपुर ,परतवाडा ,अंजनगाव या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकरिता अल्पोबआहाराची व्यवस्था हिवरखेड, सोनाळा
टी पॉईंटवर करण्यात अली होती.
हा इजतेमा दरवर्षी प्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवडी येथे साजरा करण्यात येणार आहे.या तीन दिवसीय इस्तेमा मध्ये शेवटच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता दुवा असते यामध्ये दूर दुरून मुस्लिम बांधव येऊन अल्लाह कडे साकडे घालून दुवा करतात या इजतेमा मध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या मुस्लिम बांधवांची हिवरखेड, सोनाळा येथे व्यवस्था करण्यात आली यामध्ये वार्ड क्र २ इंदिरा नगरातील मुस्लिम बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.