Akola news:फ्रीडम इंग्लिश स्कूल अकोटच्या विद्यार्थिनींचे इन्स्पायर अवॉर्ड मानकासाठी नामांकन
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट: स्थानिक गजानन नगर अकोट स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल येथील वर्ग 6ची विद्यार्थिनी कु. सोनाक्षी वीरेंद्र इंगळे हीचे नामांकन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना 2023-24 करिता झालेले आहे. या योजनेत वर्ग 8वी च्या विद्यार्थीनी कु.चैताली सोनोने,राधिका भगत,वर्ग 7वी यश बेराड,वर्ग 6वी वसुंधरा पुंडकर, सोनाक्षी इंगळे यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना दरवर्षी शासनातर्फे राबविल्या जाते.
फ्रीडम स्कूलच्या
नामांकन प्राप्त विद्यार्थिनीचे शाळेच्या मुख्याध्यापिका कु.अरूणा शरद ताले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, संस्थेचे सचिव निलेश झाडे, मुख्याध्यापिका कु.अरूणा ताले, वर्गशिक्षिका कु. पूजा बेराड, विज्ञान शिक्षिका कु. मयुरी अकोटकर, पर्यवेक्षक विजय रेवस्कर, निखिल अनोकार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेच्या वतीने व फ्रीडम परिवारातर्फे कु.सोनाक्षी विरेंद्र इंगळे हीचे अभिनंदन केले व भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.