Akola news:रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत जेसीआय अकोट ने दिला
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
सडक सुरक्षा, जीवन रक्षा चा मंत्र स्थानिक अकोट शहरात एक व्यक्तिमत्व विकास संघटना म्हणुन जेसीआय अकोट कार्यरत आहे. गेल्या10 वर्षापासुन रस्ता सुरक्षा अभियान जेसीआय आकोट व , शेतकरी मोटर्स जनजागृती करत आहेत त्या अंतर्गत अकोट शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार तपणजी कोल्हे साहेब, माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार, अतुल भिरडे, प्रवीण बनसोड, जेसीसचे अध्यक्ष अजय अडोकार हयांचे शुभ हस्ते अकोला नाक्यावर वर सडक सुरक्षा जीवन रक्षा हया फलकाचे नेहमी करीता अनावरण करण्यात आले. राईड सेफ इंडीया हया मिशन अंतर्गत राईड सेफ प्रोग्राम,अपघात विमा जनजागृती अभियान, वाहन चालकांचे आरोग्य तथा नेत्र तपासणी शिबीर असे अनेक प्रकल्प जेसीआय अकोट नेहमी घेत असते. हया फलकामुळे रस्ता सुरक्षेबद्दल नियमीत जनजागृती होत राहील. लोकांना जीवनाचे रक्षण करायचं असेल तर नेहमी रस्त्यावर सुरक्षित वाहन चालावेच लागेल, स्वतः व आपल्या परिवाराच्या सुरक्षेते करिता, दू चाकी चालविताना नेहमी हेल्मेट वापरावे असा संदेश नेहमी लोकांचे निदर्शनास येईल त्यामुळे निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कारण आज रोजी अपघाताचे प्रमाण वाढत असुन दररोज कित्येक अपघात होत आहेत . अश्या प्रकारचे कायम स्वरुपी फलक लावुन रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती करणारा हा दुसरा प्रसंग असुन पाहुण्यानीं तथा माजी अध्यक्ष्यांनी, प्रकल्प प्रमुख विनोद कडू सचिव डॉ कृष्णन बजाज हयांचे कौतुक केले. हयावेळी रोटरी चे माजी संजयजी बोरोडे, जेसीसचे माजी अध्यक्ष आंनद भोरे, नितीनजी झाडे, नितीन शेगोकार निलेश इंगळे,भारत वासे,डॉ अक्षय बोरोडे,विवेक गणोरकर, अभिषेक दुबे, शिरीष घाटोळ, किशोर लहाने,इंजि. बोबडे,अनिल सुलताने,विजय नवले,अमित ठाकूर कार्यक्रमाकरीता शेतकरी मोटर्स चे अजिंक्य् नाथे. क्रीष्णाजी नाथे, गणेश मेंढे, ठाकूर हयांनी अथक प्रर्यत्न् केले. शेतकरी मोटर्स व पुजा टायर्स हयांनी प्रायोजीकता दिली.अशी माहीती जेसीसचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र मुरेकर कळवितात।