Akola news:हिवरखेड परिसरातील विकास कामे करण्यास मी कटिबद्ध… आ. अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन
हिवरखेड झरी मार्गाचे नूतनीकरणासाठी आणला 4 कोटीचा निधी..
हिवरखेड प्रतिनिधी शोएब खान
हिवरखेड आणि परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. हिवरखेड ते झरी रस्त्याचे नूतनीकरनाचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी आपल्या सहकार्यासोबत दौरा केला. त्यादरम्यान त्यांनी हिवरखेड झरी मार्गाचे भूमिपूजन केले तर झरी वासीयांनी त्यांच्यावर हार गुच्छाचा वर्षाव करून आपले त्यांच्या विषयी अफाट प्रेम व्यक्त केले. व या परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी नागरिकांनी निवेदने देऊन आमदार मिटकरी यांना साकडे घातले. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी या परिसराचा मी कायापालट करून विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झरीच्या सरपंच जाहेरून खातून बी होत्या.भूमिपूजन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. प्रमुख उपस्थिती मध्ये संदीप पाटील, देशमुख मॅडम, मौलवी साहेब, विनोद मिरगे, राजू खान, डॉ वाजीद अली, नुसरत खा, मो. उमर मौलाना, तुळशीदास खिरोडकार गुरुजी, वसीम बेग, कामील अली मिरसाहेब , भिका तायडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सूरज चौबे, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जावेद खान, उमर बेग मिर्झा, धिरज बजाज, शाहरुख लाला, राजकुमार भट्टड, शराफत खा, विजय पोके, जिया जमीर खा, श्रावण कवळकार, गजानन राठोड, संतोष राखोंडे, फारुख सौदागर, जमिर शेख, गालिब जमादार, काशिनाथ अस्वार, यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार मिटकरी यांनी झरी येथील मदरसा आणि हिवरखेड येथील शाहरुख लाला यांचे कार्यालयात धावती भेट दिली.
नागरिकांनी केलेल्या मागण्या
आमदार अमोल मिटकरी विकास कामात अग्रेसर असल्याचे पाहून झरी येथील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच जाहेरून खातून यांनी आणि हिवरखेड परिसरातील नागरिकांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच द्वारे आ. मिटकरी यांचेकडे विविध मागण्यांचा निवेदनाद्वारे वर्षाव केला. त्यापैकी प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.
हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना काढने,
रेल्वेशी संबंधित महत्त्वाच्या 10 मागण्या केल्या गेल्या,
झरी- धुळघाट- तुकईथड हा महाराष्ट्र मध्य प्रदेश जोडणीचा रस्ता डांबरीकरण करणे,
हैदराबाद जयपूर हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव जामोद सोनाळा हिवरखेड अकोट अकोला मार्गे मंजूर करणे,
हिवरखेड चिचारी चंदनपूर रस्ता नूतनीकरण करणे ,
वारी भैरवगड, धारगड, नरनाळा, मेळघाट, सह परिसरातील पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास करणे,
झरी येथे महावितरणचे सब स्टेशन निर्माण करणे,
हिवरखेड येथे हिंदू खाटीक समाज सभागृह बांधणे, गावातील इतर विविध विकास कामे करणे,
रेल्वे भूमी अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे,
त्यानंतर एका महत्त्वाच्या मागणीचे गोपनीय पत्र सुद्धा देण्यात आले.