Akola news:फ्रीडम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद अकोट
आकोट :-स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल, अकोट येथे आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
यावेळी योगीराज क्लिनिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रथमेश मानकर जनरल फिजिशियन यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 317 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मानकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी चांगल्या सवयी तसेच वैयक्तिक स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये आढळलेल्या आजारांविषयी सूचना यावेळी देण्यात आल्या. वैद्यकीय तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका कु. अरुणा ताले, पर्यवेक्षक विजय रेवस्कार ,प्रभारी शिक्षिका पूजा बेराड,निशा हाडोळे तसेच सहाय्यक शिक्षिका वर्षा महल्ले, पूजा डाबेराव ,रेखा अकोटकर, हर्षाली खाडे, ऐश्वर्या बोडखे, राखी वांगे ,वंदना राऊत, मयुरी अकोटकर ,प्रीती सोनोने, जयश्री तेलंगडे, विक्रांत चंदनशिव तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केल्याचे कळविले आहे.