शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू कन्या शाळेच्या पाच विद्यार्थिनींचे यश! आबा सूर्यवंशी
Five students of Urdu Girls School succeed in scholarship exam! Aaba Suryavanshi
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी ) —
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या पर्यतन करणारी जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा चे पाच विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२५ महिन्यात इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. हा निकाल पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा व उर्दू खाजगी प्राथमिक शाळा साठी प्रेरणादायी व प्रोत्साहित करणारा आहे. कारण तालुक्यात जि.प.उर्दू शाळेत व उर्दू खाजगी प्राथमिक शाळेत सर्वात जास्त विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याच्या मान उर्दू कन्या शाळा पाचोरा यांनी प्राप्त केला आहे. वर्गशिक्षक शेख जावेद रहीम यांनी या लागलेल्या निकालावर आनंद व्यक्त करून आम्ही जून महिन्यापासूनच शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेशसाठी होणारी परीक्षेची तयारी सुरू केलेली होती. जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन, संयम, चिकाटी, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, देश व राज्य पातळीवर होणारी स्पर्धा परीक्षा ची सुरुवात पाचवीपासूनच सुरू करावी, भविष्याचे अधिकारी बनून आपल्या देशाच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक विकास व्हावा अशा भविष्यातील अपेक्षा आहे. आपण इथेच न थांबता पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला निकाल देऊ असा आत्मविशास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. जि.प.उर्दू शाळांमध्ये ह्या परीक्षा बाबत स्पर्धा निर्माण करावी असे आमचे प्रयत्न असतील. उर्दू कन्या शाळेचे पाच विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झाले तरीही तालुक्यात जि.प.उर्दू शाळा व खाजगी प्राथमिक उर्दू शाळा मध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मध्ये सर्वात जास्त विद्यार्थी उत्तीर्ण करणारी शाळा ठरली आहे. जोया मोहसीन बागवान,अलीना अलीम शेख,तस्मिया शोएब खाटीक, अश्मीरा गुलाब पटेल,आलिया इमरान शेख यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ह्या यश प्राप्तीने केंद्रप्रमुख अब्दुल कदिर व मुख्याध्यापक अब्दुल एजाज, शिक्षक वृंद,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. हा निकाल तालुक्यातील इतर उर्दू शाळांसाठी प्रेरणादायी राहतील व गोराडखेडा उर्दू केंद्राला आदर्श केंद्र बनण्यासाठी सहाय्यक ठरेल असे आवाहन केंद्रप्रमुख यांनी केले आहे.