पाचोरा येथे फिरते लोक न्यायालय संपन्न,एकूण १,२०,६०० रुपयांची झाली वसुली

Mobile People's Court held at Pachora, a total of Rs 1,20,600 was recovered

 

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – मा. उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये दि.२४ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवारात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बांधव पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने सदरील मोबाईल लोक अदालत व्हॅन च्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख न्यायाधीश एस.व्ही.निमसे, सह दिवाणी न्यायाधीश जी.एस.बोरा,
सरकारी अभियोक्ता रंजना हटकर, नायब तहसीलदार कुमावत आप्पा, सपोनि दिनेश भदाणे, ॲड. प्रवीण पाटील, ॲड .अभय पाटील, ॲड निलेश सूर्यवंशी, ॲड. सुनील सोनवणे, ॲड कविता मासरे उपस्थित होते.या पूर्वी दि.२३ रोजी पिंपळगाव येथे व २४ रोजी पाचोरा येथे एकूण २७ केसेसचा निपटारा झाला यातूनच १,२०,६०० रुपयांची वसुली झाली. यावेळी जनजागृती कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले. शिबिरात प्रा. सुनीता गुंजाळ यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच ललिता पाटील यांनी महिलांच्या लैंगिक शोषण विषयी सांगितले. यानंतर प्रा.वैशाली बोरकर यांनी फिरते लोक अदालत चे महत्व व लाभ सांगितले. यानंतर ॲड .कैलास सोनवणे यांनी महिलांचे संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जी.एस.बोरा, सह दिवाणी न्यायाधीश यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फिरते लोक अदालत चे विविध लाभ, योजना, महत्त्व स्पष्ट केले. यावेळी मोठया संख्येने सन्माननीय वकील बांधव, पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड .प्रवीण पाटील तसेच ॲड .अभय पाटील यांनी तसेच सूत्रसंचालन दिपक तायडे यांनी केले तर आभार सपोनि दिनेश भदाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी यावेळी पहलगाम येथील अतिरेकी च्या हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोहेका दीपक पाटील, विकास सूर्यवंशी, सुनील पाटील, संदीप भोई, समीर पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, हरीश अहिरे तसेच न्यायालयीन कर्मचारी, वकील बांधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button