आमदार मनोज दादा घोरपडे यांनी घेतलेल्या कराड येथील जनता दरबारात जनतेचे 300 प्रश्न निकालात

MLA Manoj Dada Ghorpade took out 300 questions in the Janata Darbarat of Karad.

कराड : विद्या मोरे

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे यांनी आज ओगलेवाडी ता कराड येथे घेतलेल्या जनता दरबाराला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला या मध्ये 583 नागरिकांनी आपापल्या विविध विभागातील समस्या आमदार मनोज दादा घोरपडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या यावेळी 300 हून अधिक नागरिकांच्या समस्या आमदार मनोज दादा घोरपडे यांनी जागेवरच सोडवल्या. सर्व प्रथम पेहलगाम येथे झालेल्या अतेरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महसूल, भूमी अभिलेख, प्रांत विभाग, सार्वजनिक बांधकाम, एस टी महामंडळ, एम एस सी बी, मदत व पुनर्वसन,पोलीस अधिकारी,ग्रामविकास जलसंपदा,आरोग्य, एकात्मिक बालविकास, वनविभाग, शालेय शिक्षण,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पशुसंवर्धन, फेरफार,अदालत व कोषागार विभाग यासारख्या 22 शासकीय विभागामधील समस्या सोडविण्यात यश आले आहे.
यावेळी आमदार मनोज दादा घोरपडे, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, कृषी अधिकारी, नायब तहसीलदार राठोड उपनिबंधक यादव मॅडम यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आले. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे अपघात विमा च्या पात्र लाभार्त्यांना 2 लाख रुपये मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी बापूराव धोकटे,विजय कदम, नवनाथ पाटील, प्रकाश पवार,यशवंत डुबल,निलेश डुबल, संभाजी पिसाळ, विनायक भोसले, अमोल पवार,शिवाजी डुबल, आदी मान्यवर उपस्तित होते.

कराड तालुक्यातील चार मंडळातील हजारो नागरिक उपस्थित

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील चार मंडळातील विविध गावचे नागरिक महिला आपापल्या समस्या घेऊन आमदार मनोज दादा घोरपडे यांच्याकडे जनता दरबाराच्या निमित्ताने आल्या होत्या आमदार महोदयांनी जागेवरच अनेक प्रकरणांचा निपटारा करीत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नागरिकांना न्याय देण्याच्या सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button