मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई
Action taken against man transporting liquor
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – दि. १८ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा शहरातील एका ठिकाणाहून एक स्विफ्ट गाडीत दारूचा मद्यसाठा घेऊन प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती त्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक हटकर, राहुल शिंपी, होमगार्ड कपिल पाटील यांच्या मदतीने वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून सदर गाडी मधील १८० मि.ली. च्या २४० बाटल्या मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस मित्र गणेश पाटील यांच्या मदतीने सदर वाहन पाचोरा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.