ज्येष्ठ नागरिक संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल यांनी कराडच्या तीन प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Senior Citizens Association Chhatrapati Shivaji Maharaj Sports Complex submitted a statement to the Chief Officer regarding three issues of Karad

कराड : विद्या मोरे

कराड : कराड शहरातील मुख्य प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे ज्येष्ठ सदस्यानी कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना भेटून निवेदन दिले आणि नागरी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून हे प्रश्न सोडवले जातील अशी शिष्टमंडळाला हमी दिले आहे.कराड शहरातील प्रत्येक चौकाचौकात व रस्त्यांवर भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. याचा त्रास लहान मुलांसह आबाला वृद्धांना होत आहे. अनेकदा श्वानांच्या चाव्यामुळे नागरिक जखमी झाले आहेत. तेव्हा याबाबत नगरपालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.”स्वच्छ व सुंदर कराड” अशी कराडची देशात नावलौकिक आहे. दरम्यान अलीकडच्या काळामध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. घंटागाडीद्वारे घरोघरी ओला व सुका कचरा गोळा केला जातो‌ दरम्यान गेल्या आठवड्यापासून कचरा नेणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे कचरा साठून राहतो. घरांमध्ये दुर्गंधी निर्माण होत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी कराड नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलून घंटागाडी नियमितपणे प्रत्येक घरातील कचरा गोळा करण्याची व्यवस्था करावी. असे मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.कराडच्या स्टेडियमची दुरावस्था होत असून या ठिकाणी असणारे कराड नगरपालिकेच्या कोणत्याही कामगारांचे लक्ष नाही. हजारो मुले, मुली विविध खेळ खेळत असतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला चालण्याचा व्यायाम करत असतात. स्टेडियमवर धुळीचे प्रमाण वाढले आहे. धूळ सातत्याने उडते. याचा त्रास खेळाडूंसह सर्वांनाच होत आहे. त्यावर पाणी मारण्याचे कोणतेही नियोजन नगरपालिकेने केले नाही. याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिक संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे वतीने प्रश्ना संदर्भात कराडचे नवनियुक्त मुख्याधिकारी राजेंद्र व्हटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक, अध्यक्ष प्रा. डॉ. श्री चंद्रकांत माने, ज्येष्ठ सदस्य श्री अशोकराव पाटील, माजी नगरसेवक श्री विलासराव कुंभार, ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व प्रमुख मान्यवर सदस्य उपस्थित होते.

दरम्यान सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. जनतेने आपले प्रश्न जरूर प्रशासनाला सांगावेत. तसेच जनतेने सहकार्य करावे. कराडचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून यासाठी सर्वांनी यात सहभाग घ्यावा. सहकार्य व मदत करावी. असे आव्हान
प्रशांत व्हटकर
मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button