बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेस “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेत तृतीय क्रमांक
Bambrud Raniche Z.P. School won third place in the "Chief Minister's My School is a Beautiful School" competition.
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेचा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादित केला.
महाराष्ट्र राज्य शासन द्वारा राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा, बांबरूड राणीचे या शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावून मानाचा टप्पा गाठला आहे. या गौरवपूर्ण यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक भाऊ साहेब पवार यांच्या सह सर्व शिक्षकवृंद यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जि.प.शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*तपशीलवार नियोजन* शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला स्वच्छता व सौंदर्यविषयक दृष्टीकोन आणि सर्वाच्या सहभागातून हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही शाळेचे नाव उज्वल ठेवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन असेच प्रेरणादायी ठरेल असे शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष व सदस्य यांनी विश्वास व्यक्त केला.
*शाळेला एक लाखांचे बक्षिस*
शाळेला प्राप्त झालेली १,००,०००/- बक्षीस रक्कम व प्रशस्ती पत्र परिश्रमांची पावती असून हे यश सर्व शाळेसाठी प्रेरणादायी ठरेल. या प्रसंगी
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,
शालेय शिक्षण समिति अध्यक्ष रामकृष्ण पाटील , उपाध्यक्ष अशोक काळे, सदस्य किरण सुर्यवंशी, मनोज वाघ, माधवराव सोनवणे, दिपक पवार,गुलाब तडवी,
जि. प. शाळा मुख्याध्यापक तथा सचिव
भाऊसाहेब पवार
सुभाष जगताप,
प्रशांत गवळी,
सचिन सोनवणे,
श्रीमती रुपाली,
श्रीमती गायत्री जैन,
किशोर महाजन,
भटुकांत,ज्ञानेश्वर चौधरी ,
प्रविण सोनकुळ,
राकेश धायबर,
महेश गंवादे,
शिक्षक अनिल रामसिंग बेलदार आदी उपस्थित होते.