नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये इनोव्हेटर्स संघ पाचोरा विजयी
Innovators Association Pachora victorious in Night Cricket Turf Tournament
नयन सूर्यवंशी ठरला सामनावीर
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भडगाव येथे रॉयल ग्रुप तर्फे तीन दिवसीय नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या टुर्नामेंट मध्ये जिल्ह्यातील बारा क्रिकेट संघानी भाग घेतला होता.चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पाचोरा इनोव्हेटर्स संघाने अंतिम सामन्यात देशमुख रायडर्स क्रिकेट संघ पाचोरा संघाचा ३ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इनोव्हेटर्स संघाला ११,००० ₹. रोख आणि विजयी चषकाने सन्मानित करण्यात आले.
अंतिम सामन्यात नयन लक्ष्मण सूर्यवंशी हा खेळाडू सामनावीर ठरला.
इनोव्हेटर्स संघाकडून प्रशांत देवरे, महेंद्र पाटील, कुलदीप पाटील, नयन सूर्यवंशी, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, देवा परदेशी, जयेश पाटील व शुभम कदम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक आणि अभिनंदन होत आहे.