पाचोरा तलाठी कार्यालयाचा सावळा गोंधळ* तलाठ्यांच्या वारंवार बदल्यांमुळे लोकांच्या कामांचा खोळंबा
Pachora Talathi office in chaos* Frequent transfers of Talathis delay people's work
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा शहर तलाठी सजा आणि कृष्णापुरी तलाठी सजा या महत्वाच्या कार्यालयात पाचोरा तहसील विभागात नव्याने रुजू झालेले आणि या सजांचे कामांचा अनुभव नसलेले तलाठी नियुक्त केले जात आहे. नियुक्ती नंतर दिड, दोन महिन्यातच त्याच तलाठ्यांची बदली केली जात असल्याचा सावळागोंधळ तलाठी कार्यालयात सुरू आहे. या प्रकारांमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेची महत्वाची कामे वेळेत होत नाही, शासकीय आणि खाजगी कामांसाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना फिरफीर करावी लागते. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन तलाठी कार्यालयात कामकाजाचा अनुभव नसलेले आणि शिकावू तलाठ्यांच्या नियुक्ती करू नये असे तक्रारी निवेदन बल्लाळेश्वर फाऊंडेशन चे अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी पाचोरा उप विभागीय अधिकारी भूषण अहिरे आणि तहसीलदार विजय बनसोडे यांचे कडे दिले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.