सामाजिक न्याय व संघटन साठी स्वतः चे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कै आ. अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी ) याअंमळनेर तालुक्यातील ढेकुसिम येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले.
अंमळनेर तालुक्यातील जि.पःशाळा ढेकूसिम येथे गरीब व गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य करण्यात आले. सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची कार्याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रप्रमुख डॉ.बी. बी. भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी कै. आ.अण्णासाहेब पाटील याची जीवनकथा सांगत समाजाला न्याय न मिळाल्याने स्वतःचे जीवाचा त्याग करून आहुती देणार उदार दातृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार अण्णासाहेब पाटील होते.संघटन शक्तीचे महत्व याविषयी माहिती दिली. सरपंच सौं सुरेखा पाटील, शरद पाटील, किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्ती केले. सदर कार्यक्रम आयोजन ढेकू सिम येथील व अखिल मराठा महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले होते.
कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील , सरपंच सुरेखा प्रविण पाटील, शरद पाटील, बाजार समिती संचालक अमळनेर,किशोर पाटील. उपसरपंच आर्डी शरद पाटील, तालुका अध्यक्ष, गोकुळ पाटील पिंपळे, उमेश पाटील ग्रामिण जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन चौधरी यांनी तर आभार उमेश पाटील यांनी मानले.