सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक संपन्न

Peace Committee meeting held at police station in view of festival celebrations

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा, दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिस स्टेशन येथे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेत तर पोलिस निरीक्षक अशोक पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली.बैठकीत शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चर्चा करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढणाऱ्या काही मंडळाकडून समस्या आणि सूचना पोलिस प्रशासनाला मांडण्यात आल्या. प्रशासनाच्या वतीने देखील योग्य त्या सूचना व मार्गदर्शन संबंधित विभागांना मिरवणूक संदर्भात सूचना देण्यात आल्या बैठकीला पाचोरा शहरातील भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते , बांधकाम विभागाचे अभियंता डी.एम.पाटील, महावितरणचे श्री .हेलोडे उपस्थित होते. उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे तसेच नागरिकांनी परस्पर सहकार्याने उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button