बांधकाम कामगारांना गावनिहाय भांडेसंच दिले जाणार आ. किशोर आप्पा पाटील
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि ) – वरखेडी येथील बांधकाम कामगार भांडी वाटपाप्रसंगी उडालेल्या गोंधळाची आ. किशोर पाटील यांनी घेतली दखल घेतली आणि आमदारांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन गाव निहाय भांडे संच वाटप होणार असल्याचे केले जाहिर केले.
बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती जाणून घेत सरकारने बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटप योजना सुरू केली. मात्र हे संच वाटप प्रक्रियेसाठी नेमलेल्या ठेकेदारांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे बांधकाम कामगारांना मरण यातना भोगाव्या लागत आहे. ७ एप्रिल रोजी हा प्रकार तालुक्यातील वरखेडी येथे भांडी वाटप केंद्रात गोंधळ दिसून आला होता. या प्रकरणा संदर्भात पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांनी १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पाचोरा – भडगाव तालुक्यातील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे संसार उपयोगी भांडी गाव निहाय ११ एप्रिल पासुन ते २५ जुन २०२५ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वरखेडी ता. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मिळणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले. भांडे संच वाटप करण्यात येणार असलेल्या ठिकाणी दर गुरुवारी गुरांचा बाजार असल्या कारणाने दर गुरुवारी भांडी वाटप बंद असणार असल्याचे ही आ. किशोर पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका प्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी नगरसेवक बापु हटकर, सुनिल पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, योगेश पाथरवट उपस्थित होते.
अशी होणार पाचोरा तालुक्यातील गाव निहाय भांडी वाटप*-
११ एप्रिल – सकाळी ९ वाजेपासून पाचोरा तालुक्यातील वरखेडी बुद्रुक, वरखेडी खुर्द, १२ एप्रिल – भोकरी, १३ एप्रिल – वडगाव अंबे, कोकडी, जोगे तांडा नं. १ व नं. २, १४ एप्रिल – लासुरे, सावखेडा बुद्रुक, १८, १९ व २० एप्रिल – पाचोरा शहर, २१ एप्रिल – लोहारी खुर्द, लोहारी बुद्रुक, क्रमशः..
भडगाव तालुका
१५ एप्रिल – कजगाव, १६ एप्रिल – वाडे, २२ एप्रिल – गोंडगाव, सावदे, बांबरुड प्र. भ., २३ एप्रिल – तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक बुद्रुक, उमरखेड
याप्रमाणे बांधकाम कामगारांना भांड्यांच्या वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे