सह्याद्री” साठी बाळासाहेब पाटील यांच्यावर सभासदांचा विश्वास
कराड : विद्या मोरे
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अखेर पार पडली. निवडणुकीच्या मैदानात तीन पॅनेल होते. दरम्यान सह्याद्रीचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्विवादपणे आपले 21 संचालक शांतपणे, संयमी व सभासदांना आपली भूमिका पटवून देवून निवडून आणलेले आहेत. निवडणुकी दरम्यान आव्हानाची भाषा होती. संघर्षाची तयारी दर्शवली गेली. विधानसभेच्या निकालाप्रमाणेच “सह्याद्री”चाही निकाल आमच्या बाजूने लागेल सांगितले जात होते.
दरम्यान सह्याद्रीचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे शांत, संयमी नेतृत्व म्हणून पश्चिम महाराष्ट्राला माहित आहेत. कराड उत्तर व सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रामध्ये बाळासाहेब पाटील यांची कार्यपद्धती सर्वांना माहिती आहे. ते आक्रमकपणे बोलत नाहीत. विरोधकांनी आरोप केले म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत. आपले काम हे जनहितासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि जनतेच्या विकासासाठी करायचे हे आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्द त्यांनी केले आहे.
निवडणुकीच्या प्रारंभीच्या काळात संघर्ष मोठ्या प्रमाणात उभा राहील असे बोलले गेले. दरम्यान प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपली भूमिका स्पष्ट करताना जे कारखान्याचे सभासद नाहीत. त्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या यांचा बाळासाहेब पाटील यांना फायदा झाला असे आता बोलले जात आहे. सहकाराच्या निवडणुका या पक्ष पातळीवर होत नाहीत. यामुळे भारतीय जनता पार्टी व काँग्रेसमध्ये दोन गट पडले. मात्र बाळासाहेब पाटील हे खंबीरपणे निवडणुकीच्या मैदानात आपल्या सवंगड्यांसह उतरले होते.
सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील गावांचा विचार करून बाळासाहेब पाटील यांनी गटनिहाय, गावनिहाय विचार करून विजयाची खात्री असेल अशाच उमेदवारांना उमेदवारी दिली. यामध्ये बाळासाहेब पाटील यशस्वी झाले आहेत. यामुळे सह्याद्रीच्या निवडणुकीमध्ये 21 संचालक आठ हजार मताधिक्याने निवडून आले आहेत.
हेच आहेत पाच वर्षासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय देणारे 21 संचालक. पी. डी. पाटील पॅनलचे गटनिहाय विजयी उमेदवार : ऊस उत्पादक मतदार संघ कराड गट क्र. १ – शामराव पांडुरंग पाटील, आण्णासो रामराव पाटील,
तळबीड गट क्रमांक २ – संभाजी शंकर साळवे, सुरेश नानासो माने, उंब्रज गट क्रमांक ३ – विजय दादासो निकम, संजय बापुसो गोरे, जयंत धनाजी जाधव, कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ – नेताजी रामचंद्र चव्हाण, राजेंद्र भगवान पाटील, मसूर गट क्रमाक ५ – संतोष शिदोजीराव घार्गे, अरविंद निवृत्ती जाधव, राजेंद्र रामराव चव्हाण, वाठार किरोली क्रमांक 6 – कांतीलाल बाजीराव भोसले, रमेश जयसिंग माने, राहुल शिवाजी निकम, अनुसुचित जाती जमाती मतदार संघ – दीपक मानसिंग लाडे, महिला राखीव मतदार – सिंधुताई बाजीराव पवार, लक्ष्मी संभाजी गायकवाड, इतर मागास प्रवर्ग मतदार – संजय दत्तात्रय कुंभार, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग – दिनकर शंकर शिरतोडे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला. यामुळे “सह्याद्री”मध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. निकाल घोषित झाल्यानंतर संपूर्ण “सह्याद्री” च्या कार्यक्षेत्रामध्ये विधानसभेच्या निकालावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी 4 महिन्यापूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपरवर घेतलेल्या “सहयाद्री कारखाना” निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही.